मारोती काकडे
हदगाव (प्रतिनिधी) आशादीप फाउंडेशनच्यावतीने गरजुना अन्नदान व सहकार्य करण्याची भुमिका गत दोन वर्षापासून सातत्याने सुरू असून आज दि. १४ मार्च रोजी वाजपेयी नगर येथील मयुरी काळे यांच्या लग्नाकरीता लागणारे लग्नउपयुक्त अन्नदान केल्याचे दिसून आले.
आशादीप फाउंडेशन हदगावची स्थापना डिसेबर २०२० मध्ये हरिश्चंद्र चिल्लोरे यांनी केली. समाजाच्या अस्मीतेचे व जिव्हाळ्याचे व समाज हिताचे सामाजिक कार्य असल्यामुळे त्यांच्या समविचारांप्रवाहात अनेक दानशुर व्यक्ती विविध भागातून जोडले गेले. सर्व दानशूर समाज बांधवांच्याच सहकार्याने आशादीपने समाजातील अनेक गरजूवंताना शैक्षणिक व लग्न समारंभामध्ये तसेच नैसर्गिक कार्य जोपासण्याचे कार्य गत दोन वर्षापासून सुरू केलेले आहे.
असाच समाज कार्याचा वसा हाती घेत आशादीपने सहकार्याची भुमिका आंगिकारली आहे. दि. १४ मार्च रोजी मयुरी काळे हिच्या विवाहासाठी सामाजिक कार्याची जान असण्या एका पत्रकारांने मयुरी काळे यांच्या कौटुंब परिस्थितीची माहिती आशादीप फाउंडेशनच्या अध्यक्ष व सदस्याना दिली. स्वतः वधुच्या आईने देखिल आशादीप फाउंडेशनकडे लग्नकार्यासाठी मदत करण्याची विनवणी केली. तेव्हा आशादीपच्या अध्यक्षासह सर्व सदस्यानी आणि पदाधिका-यांनी कोणताही विलंब न लावता तसेच मयुरी काळे यांचा विवाह १८ मार्च रोजी असल्याने अल्पदिवसा मध्ये फाउंडेशनच्या सर्व सदस्याना माहिती दिली. तेव्हा लग्नात लागणा-या अन्नधान्याची गरज आसल्याची माहिती घेत गहू, तांदूळ, तेल व इतर लग्न उपयोगि साहित्य आशादीप फाउंडेशनच्या सर्व दानशूर सदस्यांच्या वतीने जमवत तात्काळ मयुरी काळे यांच्या कुंटुंबाना घरपोच मदत देऊ केली. राजू काळे यांनी सर्व लग्न साहित्य त्यांच्या स्वतःच्या वाहनातून मोफत घरपोहच पोहचती केले. मयुरी काळे यांचे कुंटुंब हे वाजपेयी नगर येथे वास्तव्यास असून २०२० रोजी मयुरीच्या वडीलाचे निधन झाले. तेव्हा कुंटुंबातील दोन मूले, दोन मुली व सासू असा परीवार सांभाळताना इतरांच्या घरी धुनी भांडे करत उदरनिर्वाह करण्याचे काम मयुरी काळे हीच्या आई करताना दिसून येतात. हालाकीची परिस्थिती आसतांना देखिल मुयरीच्या आईने मयुरी काळे ( वधु ) बि.ए. व्दितीय वर्षा पर्यत शिक्षण दिले आहे. अशा कुंटुंबाना मदतीची आवश्यक असताना आशादीप फाउंडेशने केलेली अन्नदान्याची मदत काळे कुंटुंबाला आधार मानली जात आहे. मदतीसाठी मयुरीच्या आईनी याचना केली. मयुरीचे वडिल जिवंत असते तर हा पसंग कदाचित ओढवला नसता असा ही प्रश्न मयुरीच्या आईच्या मनी आला आसावा परंतु काळापूढे कोणाचे चालनार या हेतूने मन घट करत लग्नाच्या मदतीसाठी अनेकाकडे यांचना केली. अशा संकटप्रसंगी आशादीप फाउंडेशचे अध्यक्ष व संदस्य माझ्या मूलीच्या लग्नास मदत करण्यासाठी धावून आले हे मी विसणार नाही हे मयुरीच्या आई म्हणाल्या.
अन्नदानासाठी आशादीप फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश खानसोळे, संस्थापक सचिव हरिश्चंद्र चिल्लोरे, बापूसाहेब देशमुख, निवृत्ती वानखेडे (मामा), राजू काळे, दिलीप नवसागरे, राजू पांडे, अनुप सारडा, राहूल तुप्तेवार, विठ्ठल पंडीत, काळे यांच्यासह तालुक्यातील दानशुराचे सहकार्य लाभले.