मुखेङ…
राष्ट्रवादिचे आ अमोल मिटकरी यांनी हिंदू विवाह पद्धति बाबत आणि त्याप्रसंगी उच्चारण्यात येणाऱ्या मंत्रा तंञा बाबत अतिशय खोटी माहिती देऊन खिल्ली उडवून हिंदू धर्मीयांची भावना दुखविल्या आहेत.
मुखेड ब्राह्मण सभा शाखेच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांचा अतिशय कङक शब्दात निषेद करण्यात आला आहे व त्यांच्या विरुद्ध योग्य ती कङक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मुखेड यांना शुक्रवार रोजी देण्यात आले ..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते वादात सापङत असतात तसाच प्रकार एक नविन घङला आहे मिटकरी यांनी हिंदू विवाह पद्धति बाबत आणि त्याप्रसंगी उच्चारण्यात येणाऱ्या मंत्रा बाबत चुकीची माहिती देऊन जाहीर सभेत हिंदू धर्मीयांची खिल्ली उडविली व हिंदू धर्मीयांच्या भावना दुखाविल्या गेल्याचे दिसुन आले आहे..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील व नामदार धनंजय मुंडे हे उपस्थित होते. आ.मिटकरी यांनी अतिशय गंभीर चुक केली असताना त्या दोन मंत्रीमहोदयांनी सुद्धा हसवून हसवुन पुरोहित व मंत्राबाबत हसवुन खिल्ली उडवल्याचे दिसुन आले आहे..
एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्यासाठी नेहमीच मिटकरी वादग्रस्त वक्तव्य करतात. या घटनेचा मुखेड ब्राह्मण सभा शाखेच्यावतीने निषेध केला आहे व आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कङक कायदेशीर कारवाई करावी म्हणून मागणीचे निवेदन तहसीलदार मुखेड यांना देण्यात आले…
यावेळी बोलताना ब्राह्ममण सभेचे उपाध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले की आमदार अमोल मिटकरी यांना हिंदूधर्माबाबत जर पुळका नसेल तर त्यांनी हिंदू धर्माबाबत खिल्ली उडविण्याचे सुद्धा काम करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य लोकप्रतिनिधींना शोभनीय नाही असे सांगितले..
या घटनेचा मुखेड ब्राह्मण सभेने निषेध केला असून आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देन्यात आला आहे,यावेळी निवेदनावर ॲड. धनंजय येवतीकर, ॲड. आशिष कुलकर्णी, सुशील पत्की, हेमंतराव कुलकर्णी, अविनाश देशमुख, संतोष जामकर, विजय कुलकर्णी केरूरकर, अमोल जोशी, अच्युत जोशी, अविनाश कुलकर्णी, संतोष दीक्षित, गंगाप्रसाद जोशी, किशोर जोशी, महेश कुलकर्णी, गिरीश देशपांडे, अभिजीत जोशी, राहुल कुलकर्णी, जय जोशी, अविनाश जोशी, युवराज जोशी, विनायक कुलकर्णी, नागेश महाराज पालमकर, अंकुष जोशी,संदीप देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, अनंत जोशी, जय जोशी, उत्तमराव कुलकर्णी, प्रशांत मुखेडकर, अनुराग कुलकर्णी आदीसह अनेकांच्या सह्या यामध्ये करण्यात आल्याचे दिसुन आले आहे…