अहमदनगर।अनेक दिवसांपासून रखडत असलेला नगर – मनमाड महामार्ग हा वाहन चालकांसाठी जीवघेणा बनला होता मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अहमदनगर दौऱ्यामध्ये या महामार्गाचे पालकत्वच केंद्र सरकारने घेतल्याने आता या रस्त्याची समस्या लवकरच मिटणार आहे.जीवघेणे खड्डे झालेला, धुळीचे साम्राज्य असलेला व अनेकांचा जीव घेणारा रस्ता बनला आहे भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजयदादा विखे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा राज्याकडून केंद्राकडे वर्ग केला आहे.
त्यामुळे या रस्त्याचा लवकर विकास होऊन वाहन चालकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.