भाजपामध्ये प्रवेश करताना शिवसेनेच्या सुभाष साबणेंना अश्रू अनावर थांबेनासे झाले…..!
प्रतिनिधी एम बी कवठेकर
नांदेड : देगलुर बिलोली मतदार विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता भाजपाने देगलूर-बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणेंनी भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. परंतु शिवसेनेतील आठवणी सांगताना त्यांना खुप मोठ्या प्रमाणात अश्रू अनावर झालेले दिसुन आले आहे..!
भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत होते. यावेळी साबणे यांनी फडणवीसांची भेट घेत आपल्या व्यथा सांगत भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. फडणवीसांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
___मी १९९४ पासून आतापर्यंत इतके वर्ष शिवसेना वाढवली आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.असे ते बोलत होते. मी शिवसेनेवर नाराज नाही. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाही असे साबणे शिवसेनेची आठवण सांगताना म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिले आहे ते विसरणार नाही जे मागितले ते दिलं शिवसेना सोडताना खूप वाईट वाटत आहे, अशी भावना साबणे यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, आयुष्यात जय पराजय होत रहातो, पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला तो मनाला वेदना देऊन गेला. राज्यात काँग्रेस संपली होती उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात, आणि तुम्ही आम्हाला विसरता असा प्रश्नही साबणे यांनी अशोक चव्हाणांना केला. तसेच अशोक चव्हाण शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत___ , माझ्यासारख्या अनेकांची हीच स्थिती आहे. या महाविकास आघाडीतून बाहेर यावे अशी अनेक लोकांची इच्छा आहे, आमदार आणि खासदारांचीही हीच इच्छा आहे. मी जर सहन केले असते तर माझ्यावर काँग्रेसला मत मागण्याची वेळ आली असती. आज पंजाला मतदान द्या, असे म्हणायचे मग २०२४ मध्ये कुणाला मत द्या म्हणून सांगायचे, असेही साबणे म्हणाले.
देगलूरचे माझी आमदार सुभाष साबणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नरसी नायगावमध्ये पोहचले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सुभाष साबणे भाजप प्रवेश निश्चित असुन भाजपाकडून ही जागा ते लढवणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे..!