दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

जिल्ह्यातील”या” तालुक्यात पुन्हा पावसाचा तडाखा……!

शेवगाव प्रतिनिधी। वीस दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच परत एकदा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाने खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर फरशी ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती.या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे बालमटाकळी, बोधेगाव, चापडगाव, राक्षी, गदेवाडी, पिंगेवाडी, हसनापूर,दोन्ही मंगळूर, दोन्ही अंतरवाली, राणेगाव, शिंगोरी, अधोडी, दिवटे, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव शेकटे, सुकळी, मुरमी, गायकवाडजळगाव, मुंगी, हातगाव, कांबी, खाम- पिंप्री, लखमापुरी, सोनविहीर,प्रभुवाडगाव, आदी गावांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या सर्वदूर मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेवगाव गेवराई राज्य मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प होती.या पावसाने परिसरातील सर्व बंधारे, पाझरतलाव ओसंडून वाहत असून, सर्वच नद्यांना पूर आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आशा आता मावळल्या आहेत.या वातावरणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलून मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे