कुठेही बदली झाली तरी कर्तव्यात कसूर करू नका –पोलीस निरीक्षक सोहन माछरे
दिनेश दारमोड प्रतिनिधी
धर्माबाद। पोलिस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच असून याबाबत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे अहोरात्र काम हे पोलीस विभागाला करावे लागते. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण तणाव निर्माण होतो. पण निस्वार्थीपणे कर्तव्य केले की ताणतणाव येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठेही बदली झाली तरी आपल्या कर्तव्यात कसूर करू नका असे प्रांजळ प्रतिपादन धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन मांछरे यांनी काल पोलीस ठाण्यामध्ये केले.
कर्मचारी म्हटले की बदली ही ठरलेलीच असते त्या अनुषंगाने धर्माबाद पोलीस ठाण्या मधून इतरत्र ठिकाणी बदली झालेल्या चार कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ काल पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठेवण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सोहन माछरे बोलत होते.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड यांची नांदेडच्या शहर वाहतूक शाखेमध्ये, तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील मंचलवार यांची भोकर पोलीस ठाण्यात, तर रावसाहेब जाधव यांची भाग्यनगर नांदेड पोलीस ठाण्यात आणि शाम गिरी पोलीस नाईक यांची कुंडलवाडी येथे बदली झाली. उपरोक्त चारही कर्मचारी हे धर्माबाद वासियांची मने जिंकलेले होते.
धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने काल रात्री उशिरा एक कार्यक्रम ठेवून उपरोक्त कर्मचाऱ्यांचा येथोचीत सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस उपनिरीक्षक पंतोजी, पोलीस उपनिरीक्षक वाडेकर, वरिष्ठ पोलीस हेड कॉन्स्टेबल शेषराव कदम, बीट जमादार स्वामी, गोपनीय शाखेचे संतोष अनेराये, बिट जमादार मसलेकर, अबेदअली, करामुंगे, पोलीस नाईक ज्योती हनवते, शुभांगी साळुंखे, ज्योती सोनकांबळे, विठ्ठल सुपारे, चुक्केवाड, मांजरमकर, अलीम, मुंगल व बहुतांशी पोलीस कर्मचारी व पत्रकार संजय कदम उपस्थित होते.