अहमदनगर
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील डॉक्टर इरफान शेख यांचा दलित वस्तीत सत्कार…..
देवगाव प्रतिनिधी।देवगाव येथे कार्यरत असलेले डॉक्टर शेख यांनी कोरोना या काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता दलित वस्तीतील लोकांसाठी अहो रात्र येऊन लोकांना उपचार देत त्यांनी आपल्या कामाचा हक्क बजावला
तरीही दलित वस्तीतील सर्व स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन डॉक्टर इरफान शेख यांचा सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब वाल्हेकर,तसेच अशोक वाल्हेकर तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सनी नेटके व पत्रकार लखन वाल्हेकर यांनी केले व डॉक्टर शेख यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील काळात ही असेच काम करील असे सांगितले.