सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातील तरुणीसोबत घडलं विपरीत,रेल्वे रुळावर आढळला मृतदेह…
प्रतिनीधि।हर्षद यरवलकर
पुणे।पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणी काही कामानिमित्त सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण ती नंतर परतलीच नाही. पण रात्रीच्या सुमारास हडपसर परिसरातील रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.प्रतिमा भास्कर कुटगे असं 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव असून ती मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर वसाहतीतील रहिवासी आहे. मृत प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर पडली होती. सायबर कॅफेत काहीतरी काम असल्याचं तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं. पण सायंकाळी थेट मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रतिमाने आत्महत्या केली की तिचा अपघात झाला, किंवा तिच्यासोबत काही घातपात घडला जर ह्यात काही सिद्ध झाले तर त्या मागचा नेमक कारण काय होत ह्यांच्या तपास पोलिस करतील , तरी याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. पोलीस आपले सर्वोतपरी प्रयत्न पणाला लावून तपास करत आहेत.