कान्हेगाव येथील शेततळ्यामध्ये पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू…..
वांगी प्रतिनिधी।श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील बाळासाहेब खरात यांच्या मालकीच्या गट.1/2 असलेल्या शेत तळ्यामध्ये पोहोण्यासाठी दिनांक 20/9/2021 रोजी गेले असता चैतन्य श्याम बर्डे वय वर्ष 8 चैतन अनिल माळी वय वर्ष 10 दत्ता अनिल माळी वय वर्ष 6 हे तीन मुले अंघोळी साठी गेले असता तळ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून या तीन बालकांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने तळ्याकडे धाव घेतली तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले सदर मिळालेल्या माहितीनुसार ही मुले गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 9 2021 रोजी गणपती मूर्ती पाण्यातून वर काढण्यासाठी तळ्याकाठी गेले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यांचा तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असे स्थानिक गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे या घटनेचा पंचनामा करून हे मृतदेह साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घडलेल्या घटनेचा पंचनामा रिपोर्ट तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे परंतु अद्याप घडलेल्या घटनेबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.