दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

कोळकी, ता. फलटण येथील सर्वे नंबर २० मधील गोविंद पार्क प्रकल्प बेकायदेशीर, जिल्हाधिकाऱ्यांचा रद्दचा आदेश…..

सातारा प्रतिनिधी।फलटण तालुक्यातील कोळकी येथील सर्वे नंबर २० मधील गोविंद पार्क प्रकल्पातील अनधिकृत पाडलेले भूखंड बेकायदेशीर असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला असून या बेकायदेशीर प्रकल्पात सर्व सामान्य लोकांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याची माहिती संजू वसंत काळे यांनी दिली आहे.

फलटण येथील विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संजू काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे कोळकी ता.फलटणमध्ये सचिन भोसले व इतर लोकांनी सर्वे नंबर 20 मधील शेतजमीन खरेदी करून त्याठिकाणी बेकायदेशीरपणे महसूल अधिकारी व भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांचेशी आर्थिक लागेबंध करत सदर सर्वे नं २० मध्ये शेती झोन असताना कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता उपअधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा जवक व कार्यालयातील इतर कर्मचारी यांनी आर्थिक लाभापोटी सदर सर्वे नं २० मध्ये पोटहिस्सा मोजणी करून बेकायदेशीर तुकडे जोड -तुकडे बंदी कायद्याचे उलंघन करत शेतजमीन बेकायदेशीरपणे गुंठेवारी मध्ये तुकडे पाडणे व सदर बेकायदेशीर शेतजमिनीचा गुंठेवारी लेआउट तयार करून गोविंद बाग या नावाने प्रकल्प तयार करून अनेक सर्व सामान्य नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक करत सदर भूखंड बेकायदेशीर विक्री केले आहेत. दरम्यान याप्रकरणी त्यावेळचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार रमेश पाटील , मंडलअधिकारी व्ही.बी. जोशी, गावकामगार तलाठी सचिन क्षीरसागर यांनी व दुय्यम निबंधक यांनी मदत केल्याप्रकरणी दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांचेकडे तक्रार दाखल केली होती. यावर उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असताना कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेकडे न्याय मागितला असता सदर जिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व प्रकरणाची कागदपत्राची तपासणी करून त्यांनी संबंधित अहवाल मागवून सर्वे नं २० मो.र.नं .२७०१ नुसार पाडलेले बेकायदेशीर पोटहिस्से व त्याबाबतचा फेरफार क्रमांक १४११० मौजे कोळकी गावास एकत्रीकरण योजना लागू झाली नाही असे खोटे कारण दाखवून उपअधीक्षक शिल्पा जवक यांनी अनअधिकृतपणे केलेल्या पोटहिस्सा मोजणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २३ सप्टेंबर, २०२१ रोजी रद्द केला आहे.

सदर निकालानुसार सर्वे नं २० बाबत पोटहिस्सा मो.र.नं. २७०१/२० अन्वये करण्यात आलेले पोटहिस्से व आकारफोड पत्रक क्र . ४८६/२० तत्काळ रद्द करणेत येत असून फेरफार क्र १४११० व त्यानंतरचे झालेले सर्व फेरफार पुनर्विलोकनात घेऊन विना विलंब तत्काळ रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी फलटण व तहसीलदार फलटण यांना दिले आहेत. त्यामुळे कोळकी येथील सर्वे नं २० मधील गोविंद पार्क मधील सर्व फेरफार रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दिले आहेत त्यामुळे व्ही.एन एस ग्रुपचे सचिन भोसले व इतर यांनी विक्री केलेले भूखंड रद्द ठरविले आहेत.

सदर यामुळे सर्व सामान्य लोकांचे कोट्यवधीची फसवणूक झालेचे सिद्ध होत आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी फलटण शिवाजी जगताप, तत्कालीन तहसीलदार आर.सी. पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा जवक , मंडलअधिकारी व्ही.बी.जोशी , गावकामगार तलाठी कोळकी सी.एन. क्षीरसागर, मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख फलटण व्ही.जि. जाधव , छाननी लिपिक आसवले, भूकरमापक दीक्षित यांच्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न केलेने सदर प्रकरणी येणाऱ्या काळात कार्यवाही न झाल्यास या सर्वांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे असे तक्रारदार संजू काळे यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे