जिल्ह्यात शस्त्रबंदी,जमावबंदीचे आदेशान्वये नियमावली जाहीर…..
अहमदनगर प्रतिनिधी। शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या आदेशान्वये नियमावली जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारींनी दिले आदेश
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने घालवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होऊ नये, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून समाजात तेढ निर्माण होऊ नये, याबाबत मंडळांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, मोर्चे, आंदोलने करू नये, रास्ता- रोकोही करता येणार नाही. यासाठी जमाबवंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाठ्या-काठ्यांसह शस्त्र बाळगणे, घोषणा देणे, प्रक्षोभक भाषण करणे यावर बंदी आहे. अंत्यविधी, लग्न समारंभ यासाठीही काही नियमावली केली आहे. हा आदेश (ता. २४) सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
२४ सप्टेंबरपर्यंत लागू
कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान सुमारे अडीच हजार पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक हजार होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक कंपनी तसेच इतर कुमक मागविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात खबरदारीसाठी प्रशासनाने तयारीकेली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.गणोशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.