रायगड प्रतिनिधी।नविन पनवेल देवद येथे राहणारी दर्शना पवार या गरीब विद्यार्थिनीस जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने तिची शैक्षणिक फी आणि पाठ्य पुस्तकासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
दर्शना ही नवीन पनवेल येथील बाठिया शाळेत 12 वी कॉमर्स मध्ये शिकत आहे. घरातील परिस्थिती हालाकीची आहे आई घरकाम करून घर भागवते.जाणीव च्या वतीने वारंवार अश्या पद्धतीचे उपक्रम राबवले जात आहेत. गोरगरिबांना व गरजूची सेवा हिच देश सेवा व ईश्वर सेवा हे मनात ठेउन जाणीव च्या वतीने मदत करताना जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा उपसभापती राजेश केणी, खजिनदार संदीप यादव,जाणीव च्या सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा राजेश केणी आदी मंडळी उपस्थित होते.