कन्नड प्रतिनिधी।कोणत्याही पदाची लालसा नसुन केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर मी राजकारणात आले आहे, त्यामुळे जसे कार्यकर्ते सांगतील, त्या दिशेने निश्चित मी जाणार असल्याचे माजी जि. प. सदस्या संजनाताई जाधव यांनी सांगितले.
हतनुर येथे पंचायत समिती सदस्य किशोर पवार व चिकलठाण येथील पं. समीती सदस्या रंजना चव्हाण यांच्या १५ व्या वित्त आयोगातून पूर्ण झालेल्या आरओ वॉटर फिल्टर प्लांट, हायमास्ट लाईट, पत्राचे शेड या विकास कामाचे लोकार्पण संजना जाधव यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी आ. नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, बाजार समितीचे सभापती प्रकाश घुले, पंचायत समिती उपसभापती सुनील निकम, पं. स. सदस्य किशोर पवार, सरपंच आशा अकोलकर, उपसरपंच नईम शेख, माजी उपसभापती एस. बी. अकोलकर, वसंतराव नलावडे, गंगा मोहीते, कारभारी गवळी, पंचायत समिती सभापती अप्पाराव घुगे, भाजपाचे जिल्हासचिव संजय गव्हाणे, रंजना चव्हाण, सुरेश चव्हाण, शिवप्रभु ज्ञाने, दत्तु चव्हाण, बापुसाहेब चव्हाण, समीर कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक नलावडे तर प्रास्ताविक कैलास अकोलकर यांनी केले.