सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वसंतनगर (को)ता.मुखेड जि.नांदेड येथे आज थोर समाजसुधारक राष्ट्रसंत,गाडगेबाबा (महाराज) यांच्या पुण्यस्मरणा निमित्त प्रतिमेश पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले…
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य बी.एम.मेघाजी सर,उपमुख्या सौ.प्रेमला स्वामी मॅडम,पर्यवेक्षक सुभाष राठोड सर,संस्कृतिक वि.प्रमुख भारत जायभाये सर सह सर्व शिक्षक प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते…
राष्ट्रसंत गाडगे बाबा नेहमी समाजात फिरून त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील कचरा, अंधश्रद्धाळू विचार, लोकातील दांभिकता, कडक शब्दात दूर करायचे.
दगडात देव नाही, तर माणसात देव शोधायला शिका, व देव माणसातच आहे असे ते म्हणायचे..
संत तुकाराम महाराज यांच्या सारख्या प्रखड शब्दात ते सत्य मांडण्याचे कार्य करायचे. समाजासाठी कार्य करताना, अनेकदा त्यांना त्रास, अपमान सहन करायला लागला, परंतु त्यांनी न डगमगता आपले कार्य चालूच ठेऊन त्यात यश प्राप्त करून समजापुढे आदर्श निर्माण केला.
स्वतःचा मुलगा मेल्यावर ते समाजाच्या
कार्यात असताना त्यांना ही बातमी कळाल्यावर ते
म्हणाले,
मेले कित्येक कोटी कोटी, रडू कुणा कुणासाठी
संपूर्ण समाजाला व त्यातील दीनदुबळ्यांना,
व स्वतच्या मुलाला देखील ते समान पातळीवर
वागणूक देत असत. आजच्या आधुनिक समाजातील माणसाला गाडगे महाराजांच्या जीवन कार्यातून, वाणीतून, त्यांच्या जीवन तत्त्वातून, त्यांच्या शिकवणुकीतून बरेच काही घेऊन स्वतः व समाजा- मध्ये बदल करता येईल. वरील विविध गुणांनी युक्त गाडगे बाबांचा मृत्यू दि. २० डिसेंबर १९५६ रोजी झाला.
गाडगेबाबा आपल्यात फक्त शरीराने जिवंत नाहीत पण ते विचाराने आजही जिवंत आहेत. विज्ञान युगात जगणाऱ्या आजच्या माणसाला गाडगेबाबांनी दाखवून दिलेल्या वैज्ञानिक श्रद्धेच्या व स्वच्छता तसेच चारित्र्याच्या शिकवणुकीच्या मार्गावरुन चालता आले, तर खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्याच मोल होईल.
संत गाडगेबाबा यांना त्यांच्या पुण्यतिथी- निमित्त त्यांनी घालून दिलेल्या आदर्श, विज्ञानवादी, निसर्गवादी, मानवतावादी, समाजवादी व समानतेच्या मार्गावर चालूनच खरे वैचारिक अभिवादन ठरेल…
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा