दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

समाजमाध्यमावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकावर शस्त्राने वार

पुणे प्रतिनिधी।प्रतिस्पर्धी गटातील एकास समाजमाध्यमावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दहशत माजविण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली.या प्रकरणी फहिम फिरोज शेख (रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ अशोक सदाफुले (वय २२, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाफुले याचा मित्र काळू घोलप याच्याशी आरोपी शेख याचा वाद झाला होता.

घोलप याच्या वाढदिवसानिमित्त सदाफुले याने समाजमाध्मयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या कारणावरुन शेख सदाफुले याच्यावर चिडला होता. शेख याने सदाफुलेला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. मी आंबेडकरनगरचा दादा आहे, अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत माजविली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे