दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ कंधार तहसील कार्यालयासमोर 12 जून रोजी जाहीर निदर्शने

कंधार तालुका प्रतिनिधी:- एम. जे. सय्यद

कंधार प्रतिनिधी:-  नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे गावातील जातीयवादी गावगुंडानी अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या केली असून या हत्येच्या निषेधार्थ व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सोमवार दि.12 जून रोजी कंधार तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या जाहीर निदर्शनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फुले,शाहू,आंबेडकर विचारांच्या समस्त बहुजन बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोंढार हवेली येथे दि.1 जुन रोजी गावातील जातीयवादी गावगुंडानी बौद्ध युवक अक्षय भालेराव यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली असून या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे.हि घडलेली घटना खुपच गंभीर व निषेधार्थ आहे.अक्षयला व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी समस्त बहुजन बांधवांच्या वतीने शासकीय विश्रामग्रह कंधार येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला कंधार नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,युवा जिल्हा उपाध्यक्ष विहान पाटील कदम,माजी नगरसेवीका अनिताताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत सोमवार दि.12 जून रोजी सकाळी 11 वाजता कंधार तहसील कार्यालयासमोर अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी,खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी.अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.या जाहीर निदर्शनाला कंधार तालुक्यातून फुले,शाहू,आंबेडकर विचारांच्या समस्त बहुजन बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे,कपिल जोंधळे,सचिन पट्टेकर,शेख रब्बानी,सचिन जारीकोटे,वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव बबन जोंधळे,तालुका महासचिव प्रेमानंद गायकवाड,महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना एंगडे,नवनाथ बनसोडे,बाळू धुतमल, मारोती गायकवाड,सागर कदम,राहुल कदम,शेख एजाज,विजय कांबळे,किरण जोंधळे,सुनील कांबळे,किरण आगबोटे,अर्जुन जोंधळे,प्रवीण कांबळे दिग्रसकर,नितीन कांबळे दिग्रसकर आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे