धर्माबाद प्रतिनीधी। लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवीन मतदारांनी ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान पत्रकार राहुल वाघमारे तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.अशा प्रकारे मतदान यादीत आपल्या नावाचा समावेश करा जर तुम्ही नवी मतदान कार्ड बनवत असाल, तर तुमच्याकडे स्वत:चा ईमेल आयडी आणि फोन नंबर असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर www.nvsp.in वर जावे लागेल.वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला फॉर्म ६ पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला लक्षपूर्वक भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही जी काही माहिती भरणार त्याच्या आधारावर तुमचे मतदान कार्ड बनणार. यामध्ये तुमचा फोटो, वय, EPIC नंबर, घरचा पत्ता, जन्म तारीख, वय, लिंगसह इतर माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.याबाबत अधिक असे की १ जानेवारी २०२२ ला आपले वय १८ वर्ष झाले. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून व नगरपालिका निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणूक येत आहे त्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांना आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा. तसेच ज्या नागरिकांच्या मतदार कार्डात चुका असतील त्या दुरुस्तीचे ही अभियान सुरू आहे.तरी नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी
जर फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली, तर अर्ज केल्यानंतर १५ दिवसानंतरही तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये बदल करु शकता.मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते.केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे.
मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. म्हणून धर्माबाद शहरातील सर्व सुजाण नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे आवाहन पत्रकार राहुल वाघमारे तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.