दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे विसर्जन

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे विसर्जन.

(राहुरी वार्ताहर )तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आरडगाव येथे पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. या कार्यक्रमाला आरडगाव मधील माननीय सुनील मोरे यांच्या हस्ते महाआरती करून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या समवेत प्राचार्य माननीय जगदीश मुसमाडे सर हे होते .

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजने केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती माननीय सुनील मोरे यांना देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनवण्यासाठी सहभागी झाले होते .अशा विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये तक्षज्ञच्या क्रीडांगणामध्ये खड्डे घेऊन गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या भक्तीमय व भावनिक वातावरणामध्ये निरोप देण्यात आला.
त्यावेळेस उपस्थित कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा.अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे, प्रा. सोनाली शिरोळे, प्रा . अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने, प्रा वैष्णवी शिरसाठ शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण, आकाश बोर्डे, अमोल पवार सर्व उपस्थित होते.

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे विसर्जन करताना प्रमुख पाहुणे सुनील मोरे प्राचार्य जगदीश मुसमाडे, प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर उपस्थित सर्व प्राध्यापक.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे