दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नेवासा तालुक्यातील घटना…! लेडीज शॉपीतून तब्बल ज्वेलरी 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवले…

नेवासा प्रतिनिधी। नेवासा येथील ब्युटी पार्लर व लेडीज शॉपी दुकानातून 133 साड्या, 94 लेडीज टॉप, लेडीज ज्वेलरी व रोख रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी अमोल पागिरे (वय 28) रा. पावन गणपती मंदिर परिसर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली आहे.नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपती समोर असलेल्या अश्विनी पागिरे यांच्या साक्षी ब्युटी पार्लरचा कडी-कोयंडा उचकाटून चोरट्यांनी वेगवेगळ्या दराच्या २४ हजारांचा १३३ साड्या,९४ लेडिज टॉप, १३ हजार रुपयांचे साहित्य, कपडे, ६७ हजारांच्या १ ग्रॅम ज्वेलरीचे १२ नग, बांगड्या, साडेतीन हजारांची रोकड,असे एकूण १ लाख १० हजार १३१ रुपये किमतीचे साहित्य लंपास केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीराम गिते करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे