श्रीराम साधना आश्रम मुकींदपुर येथे शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा….
प्रतिनिधी-बाळासाहेब पिसाळ
नेवासा प्रतिनिधी।प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने व अजानबाहू योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज व सद्गुरू स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व प.पू.गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली,
भव्य शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने संगीतमय देवी भागवत कथे चा प्रारंभ ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला असून आज कथेचा ८ वा दिवस दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी कथेची सांगता झाली आहे,
या कथा निरुपण भागवताचार्य व कीर्तनकार महंत साध्वी सुवर्णानंद गुरूमुक्तानंद चैतन्य महाराज(दत्त सेवा संस्थान,पैठण) यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली.
तसेच विजया दशमी दसरा या दिवशी ह.भ.प. महंत सुवर्णानंद महाराज यांचे कीर्तन होईल तद्नंतर काला महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे,तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती, देवस्थान चे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले आहे
सर्व शासकीय व कोरोना नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला.
ठिकाण- श्रीराम साधना आश्रम, रामनगर मुकींदपुर,