दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

सततच्या पावसामुळे कंधार परीसरातील खरिप पिके पाण्यात…उडीद, मुग पाण्यात, बळीराजा अडचणीत….

कंधार/प्रतिनिधी -सय्यद मेहराज

कंधार प्रतिनिधी।गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व ढगाळ वातावरामुळे ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असणार्‍या सोयाबीन पिक हे संकटात सापडले आहे. मुग,उडीद हे पिके तर मुसळधार पावसामुळे नदी, नाल्याला आलेल्या पूराच्या प्रवाहात चक्क वाहून गेल्याने शेतकर्‍यांना या वर्षी मुग व उडीदाचे पिके हातालाच लागले नाहीत. तर सोयाबीन हे सततच्या पावसामुळे कुजण्याच्या स्थितीत असल्यामुळे उत्पादनात मोठा घट होणार असून फुलवळ परीसरातील शेतकरी संकटात सापडला असूनही याकडे माञ संबधित विभागाच्या अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
अल्प काधावतीत व नगदी पिके म्हणून सोयाबीन, मुग, उडीद घेतली जातात परंतु पेरणीपासूनच वरुनराजा सारखा बरसत असल्यामुळे या पिकांची वाढच झाली नाही. सतत पडणार्‍या पावसामुळे मुग उडीद शेतातच चिखल झाले तर सोयाबीन पिक हे पुर्ण पिवळे पडले.
पावसामुळे शेतकर्‍यांचे नगदी पिकाचे स्वप्न हीरावून नेण्याची परीस्थिती निर्माण झाली आहे. या पिकांची पाहणी करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फुलवळ परीसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
कंधारपरीसरातील बहादरपुरा, मानसपूरी, मुंडेवाडी, सोमासवाडी, कंधारेवाडी,केवळातांडा, माहादेवतांडा यासह परीसरातील शेतकर्‍यांचे उडीद मुग हे पिके पुर्ण पाण्यात असून सोयाबीनही मातीमोल झाल्याचे परीस्थिती आसल्याचे पाहावयास मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे