वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष यांच्याशी पाटस टोल प्लाजवर गैरवर्तन….
दौंड प्रतिनिधी।तालुक्यातील पुणे – सोलापूर हायवे पाटस टोल नाक्यावर दौंड तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अश्विनभाऊ वाघमारे यांच्याशी पाटस टोलनाक्यतील कर्मचारी यांनी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्यामुळे दौंड मधील बहुजनांनमध्ये संतापाची भावना पसरू शकते. अश्विन वाघमारे हे चळवळीतील तरूण कार्यकर्ते आहेत चळवळीतील काम करत असल्यामुळे त्यांना सामाजिक कामानिमित्त तसेच ग्रामीण भागातील अनेक अडचणी विविध लोकांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी प्रवास करावा लागत असल्याने अशाच सामाजिक कामानिमित्त दि.१०आॅक्टबंर २०२१ रोजी सकाळी ९:४० दरम्यान टोल प्लाजवर आपल्या कुटुंबा सामवेत होते त्या दरम्यान लेन नं १४ मधून जात असताना त्यांच्याशी टोलनाक्यावरील कर्मचारी यांनी गैरवर्तन केले चुकीची वागणूक दिली
पाटस टोल प्लाजवर सिक्युरिटी च्या नावाखाली गुंडप्रवृत्तीचे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असल्याने त्यांची पोलीसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी व केली आहे. तसेच पटकन त्यांच्या संदर्भात निर्णय द्यावा.
पाटस टोल प्लाजवर वर इतर पक्षांच्या वाहनांना प्राधान्याने सोडून दिले जातात आणि आंबेडकरी विचारांवर व शाहू, फुले यांच्या विचारांनी प्रेरित काम करणार्या पक्षांच्या प्रमुखांच्या गाड्या जाणीव पूर्वक अडवून त्यांचा अपमान केला जातो असा अरोप केला जात असून . असे जर होत असेल तर कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्व सेतू व्यवस्थापक जबाबदार राहील असा इशारा ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून देण्यात आला तसेच टोलनाका व्यवस्थापक यांच्या कडे निवेदन पत्र सोपवण्यात आले.