जिल्हा परिषद शाळेत जागतिक हात धुणे दिवस उत्साहात साजरा…
पुणे प्रतिनिधी।दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा गणेगाव खालसा व जिल्हा परीषद शाळा वरुडे येथे जागतिक हात धुणे दिवस आयटीसी मिशन सुनहरा कल व फिनिश सोसायटी तर्फे साजरा करण्यात आला. जागतिक हात धुणे दिवसा निमित्ताने शाळेतील विद्यर्थ्यांना हात धुण्याच्या ६ पद्धती शिकवण्यात आल्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना हात धुवण्याच्या प्रत्येक पद्धतीचा फायदा कश्या प्रकारे होते ते सांगण्यात आले व प्रत्याक्षात विद्यार्थ्यांकडून हात धुवण्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जागतिक हातधुवा दिवस का साजरा केला जातो याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना हात न धुतल्यामुळे व हात धुतल्यामुळे आरोग्यास होणारे फायदे सांगण्यात आले.आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सांगण्यात आले. या कार्यक्रमास फिनिश सोसायटीचे आशिष डहाळे, अतुल पाचोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत रुके, रवींद्र तांबे तसेच शाळेतील मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद व पालक उपस्थित व ११० विद्यार्थ्यांनी उपस्थिती होते.