कन्नड प्रतिनिधी।टापरगाव येथे महर्षी वाल्मिकऋषी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा तसेच मा. किशोर पवार (प. स. सदस्य हातनुर) यांच्या निधीतून विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माननीय आमदार अंबादास दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संजनाताई जाधव , मा.आ. उदयसिंग राजपूत, मा. श्री किशोर आबा पवार जि.प.सदस्य, प.स.सदस्य श्री किशोर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी बाजार समिती सभापती प्रकाश घुले, संचालक जयेश बोरसे, अवचित नाना वळवळे (मा.जी.प.सदस्य), तालुकाप्रमुख केतन काजे, अक्षय शिरसाठ व तालुक्यातील विविध पदाधिकारी, टापरगाव चे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य आणि गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.