कन्नड प्रतिनिधी।विजया दशमीनिमीत्त अंतुर किल्ला येथे दुर्गपूजन करुन दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
अंतुर किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सह्याद्री प्रतिष्ठाण, हिंदू साम्राज्य महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मेळावा साजरा करण्यात आला. दुर्गपूजन, शिवपूजन, शस्त्रपूजन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठाण चे कन्नड तालुकाध्यक्ष शिवराज पाटील यांनी अंतुर किल्लाविषयी सविस्तर माहिती दुर्गाप्रेमींना सांगितली. प्रतिष्ठाणच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती डॉ पवन गिरी यांनी दिली. शिवगर्जना देवून कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठाण जिल्हाध्यक्ष गणेश पवार, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील, प्रशासक डॉ पवन गिरी, दुर्गसेवक हिंदू साम्राज्य महासंघ राजेंद्र सपकाळ, सचिन गाडेकर, सौरभ ढोणे, सुनील सोळुंखे चिमणापूर व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.