माणगांव प्रतिनिधी।गेल्या कित्येक वर्षा पासून गोरेगाव गोपाळ समाज हा चिंचवली वाडी येथे वास्तव करत आहे त्याची चौथी पिढी आज येथे आहे आज पर्यंत त्यांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे
खोल नदी तसेच खाडी मध्ये मासेमारी केली जाते त्यांच्या कडे कोणतेही असे अत्याधुनिक साधन सामुग्री नाही त्यांच्या कडे फक्त नदीत पोहण्यासाठी सांगड (दोन प्लस्टिक ड्रम पासून बनवलेले साधन ) गणपती विसर्जन, देवी विसर्जन हा गोपाळ समाजाच्या मध्येमातूनच केला जातो. काही वर्षांपूर्वी महापूर आला होता तेव्हा गोरेगाव नजीक असणाऱ्या सोन्याची वाडी तील ग्रामस्थांना गोपाळ समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कडे कोणतेही अत्याधुनिक साधन नसताना सुरक्षित रित्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढले होते
समाजाला देण्यात येणाऱ्या 15 टक्के अनुदान तुन होडी ची मागणी केली होती ती मागणी ग्रा पं ने मान्य करून गोपाळ समाजाला मासेमारी करण्यासाठी पावसाळ्यात उदभवणाऱ्या संकट कालीन कामासाठी ‘होडी’देण्यात आली त्याचे उदघाटन सोहळा दि 15 ऑक्टो रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकनेते रायगड भूषण अण्णा साहेब उचाटे तेसच लोकनेते विजयराज (अप्पा )खुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर गोरेगांव भाजप अध्यक्ष युवराज मुंडे चिंचवली ग्रामपंचायत सरपंच श्रुती नरेश कालेकर गोरेगांव ग्रामपंचायत माझी उपसरपंच चंद्रकांत गोरेगांवकर चिंचवली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विष्णु तटकरे उपाध्यक्ष नंदू पारावे महिला मंडळ अध्यक्ष जयश्री पारावे चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच मनिषा होळकर माझी उपसरपंच राकेश दर्गे,राकेश शेलार,गार्गी जांभळे सदस्य शैलेश महाडिक रायगड जिल्ह्या गोपाळ समाज अध्यक्ष चंद्रकांत होळकर रायगड जिल्ह्या गोपाळ समाज माझी अध्यक्ष अनिल माने खजिनदार अनंत तावडे व सर्व ग्रामस्थ मंडळ व गोपाळ समाज मंडळ यावेळी उपस्थित होते.