दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

हंडीनिंमगाव येथे आज नामदार शंकरराव गडाख व 1008 महंत त्रिवेनांद सरस्वती व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात

बाळासाहेब पिसाळ

नेवासा प्रतिनिधी -बाळासाहेब पिसाळ

स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव सुरेशनगर येथे आयोजित भव्य दिव्य महाशिवरात्री उत्सवा ला आज नामदार शंकराव गडाख मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य व 1008 महंत त्रिवेनांद सरस्वती यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करून सुरु झाला

दरवर्षी प्रमाणे कोरोना नंतर पुन्हा त्याच उत्साहात साजरा होणार असून आज धर्मध्वजारोहन व प्रतिमा पूजन आणि दीप पूजन करून सुरु झाला,
या कार्यक्रम प्रसंगी देवस्थान चे महाराज महंत रमेशनंद गिरी यांनी सांगितले की आपापसातले द्वेष,राजकारण हे सर्व सोडून देवस्थान कार्यात एकत्र येऊन महाशिवरात्री उत्सव ला एकत्र या, आणि भविष्यात सर्व मतभेद सोडून एकत्र या व स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान च्या धार्मिक कार्यात एकत्र येण्याचं आव्हान महंत रमेशनंद गिरी महाराज यांनी केले.

या कार्यक्रमसाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री रमेशानंदगिरी महाराज,माधवगिरी महाराज,स्वामी त्रिवेनांद सरस्वती,ऋषीनाथ महाराज,कांकरिया महाराज,शनेश्वर देवस्थान चे भागवत बानकर, विकास बानकर,मुकिंदपुर चे सरपंच सतीश दादा निपुंगे पाटील,नेवासा पंचायत समिती चे उपसभापती किशोर भाऊ जोजार ,किशोर भणगे,जनार्दन पटारे,सुरेशनगर गावचे सरपंच पांडुरंग उभेदळ,सुरेशराव उभेदळ, कल्याण उभेदळ,हंडीनिंमगाव चे सरपंच अण्णा पा.जावळे,डॉ.शिवाजीराव दरंदले,रोकडे महाराज,प्रकाश महाराज,सांगळे महाराज,उपस्थित होते

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नाथबाबा विद्यालय,व घाडगे पाटील विद्यालय यांचे लेझीम पथक हे ठरले
कार्यक्रमाचे दीप प्रजवलन झाल्यानंतर विविध मान्यवर पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवर यांचे मनोगत व्यक्त झाले,

या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व गावाने मदत केली, तसेच त्रिवेणीश्वर भक्त परिवार यांची मदत झाली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे