धर्माबाद प्रतिनिधी। धर्माबाद मध्ये गणरायाचे विसर्जन तीन टप्प्यात करण्यात आले, सात दिवसाचे रत्नाळी ,नऊ दिवसाचे बाळापुर, व दहाव्या दिवशी धर्माबाद येथील गणरायाचे विसर्जन कोरोनाच्या महामारी संसर्ग वाढू नये व शासनाच्या नियमावलीप्रमाणे गर्दी न करता भक्तीभावाने बाप्पाला निरोप देण्यात आला.
यावेळी गावातील सर्व मानाचे गणपती विराजमान झाले होते .दररोज गर्दी कमी असली तरी गणरायाची दोन वेळा भक्तीभावाने पूजा व प्रसाद करण्यात देण्यात आला.
गणपती बाप्पा —– तू जात आहे ,जरूर जा! पण आम्हाला दु:खीतांना, सुख देण्याचा प्रयत्न जरूर कर आम्हा दिन दुबळ्यांची फाटकी झोळी भर…! तातडीने म्हणजे “कोरोना’चा कायमचाच नाश कर रे बाप्पा–! वाढू दे माणसांमाणसांत श्रद्धा ,विश्वास अन् प्रेम जिव्हाळा!–फुलू दे या देशात सुख ,शांती अन् समृद्धीचा मळा—-!
या प्रकारे सर्व भक्तांनी बाप्पांना सांगडे घातले. सार्वजनिक गणेश मंडळा बरोबर राजस्थान गणेश मंडळ ,वैश्य समाज गणेश मंडळ, आवडता बाल गणेश मंडळ,श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ गुजरातथी काॅलोनी, धर्माबाद .
सर्व गणपती बाप्पांना भाव भक्ती ,भजन करून कोरोना मुक्त करून पुन्हा लवकरात लवकर या — सांगून बाप्पाला शांततेत निरोप देण्यात आला.
यावेळी गणेश मंडळानी भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन केले होते .श्रीसिद्धिविनायक गणेश मंडळ चे अध्यक्ष विनोद मोरे, उपाध्यक्ष कैलास कनुज, सचिव गंगाप्रसाद पुरणशेट्टीवार, सदस्य प्रणय गौड, आकाश ढगे पाटील, कृष्णा पपोज ,प्रकाश सबिनवार,साई चेपुरकर , सतीश पपोज, संतोष पिल्लेवाढ मार्गदर्शक नगरसेवक देविदास बिपटवार, राजू पाटील किरण उशलवाड, दर्शन व प्रसाद घेण्यासाठी पुढे घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष दिगंबर लाखमावाड, बालाजी पाटील जवळेकर, मारेती माकणे पत्रकार बसव ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान, नांदेड भारत स्काऊट गाईड जिल्हा मा.सचिव बी.पी.कुदाळे, गणेशराव पाटील राजापूरकर व रामनगर, गुजराथी कॉलनी, देवी गेली, येथील भक्तांनी शांततेत प्रसाद घेतला.
गणेशउत्सवाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी धर्माबाद येथील पोलीस विभागीय अधिकारी विक्रांतजी गायकवाड , पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिस सय्यद , ए.पी.आय.वाडेकर असे चारअधिकारी ए. एस .आय. निलेवाड, आंबेरकर, गटुवार् अनेराये संतोष 30 पोलिस कर्मचारी 30 होमगार्ड 06 महिला होमगार्ड उपस्थित होते.