कंधार प्रतिनिधी| सेवानिवृत्त नगरपरिषद कर्मचारी यांच्या मागण्या, नियमित पेन्शन होत नाही व दोन-तीन महिने होऊनही एका महिन्याची पेन्शन आदा करण्यात येते. बरेच वेळेस माननीय मुख्याधिकारी नगरपालिका कंधार यांना भेटून विनंती करण्यात आली की पेन्शनधारकांना दरमहा प्रमाणे पेन्शन अदा करण्यात यावे. मात्र सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग येईल तरच नवल, म्हणजेच याच्यावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही उपाय केले नाही. ज्यामुळे वयस्कर असलेले सेवानिवृत्त कर्मचारी बरेच प्रमाणे आजारी आहेत त्यांना औषधोपचारासाठी वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चालू कर्मचाऱ्यांच्या सुद्धा जीपीएफ चे 27-28 हप्ते व बँकेचे लोन, एलआयसीचे हफ्ते सुद्धा थकीत आहे असे समजले.
[https://g.co/payinvite/91yg10]नगरपरिषदेस भेट दिली असता पेन्शनर एल. यू. ढगे, मुसा खां, भास्करराव खुडसकर, आर. ए. गायकवाड, सय्यद अरशदअली, जी. डी फुळवळे, मो. वलीयोद्दिन, शेख बाबू व इतर पेन्शनधारक उपस्थित होते.