हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!! हार्दिक अभिनंदन!!!
आज दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी भेंडा ता.नेवासा येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम. लोंढे मॅडम यांची कन्या कु. जयश्री सुभाष लोंढे हिची एम.पी.एस.सी परीक्षेतुन
पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल विश्वकर्मा वंशीय समाज संघटन अहमदनगर यांचे वतीने गुणगौरव सोहळा श्री कृष्ण लॉन्स भेंडा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सन्माननीय श्री दिलीप दीक्षित साहेब, प्रदेशाध्यक्ष विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र, मान. श्री. काशिनाथ अण्णा नवले, माजी सभापती पंचायत समिती नेवासा, मान. श्री बाळासाहेब शेलार ,
मान. श्री सुरेश राऊत मान.सौ. दीक्षित ताई ,मान. श्री रमेशराव राजगुरू,निवृत्त तहसीलदार.मान. श्री भास्करराव कदम, अध्यक्ष बाराबलुतेदार संघटना ,मा. श्री विठ्ठलराव जाणेकर, सुतार युवा शक्ती ट्रस्ट किशोर भाऊ मिसाळ, देवेंद्र काळे मा. गणेश गव्हाणे, किशोर जी भागवत, पांडुरंग सोनवणे, तुळशीदास शेलार, सोपान राऊत, ह भ प कल्याण महाराज शिंदे, ह भ प गणेश महाराज रणमले, मा. रावसाहेब मोरे जिल्हाध्यक्ष अहमदनगर सौंदळा सरपंच प्रियंका शरद आरगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सुतार समाज बांधव, भेंडा ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी, नेवासा तालुक्यातील अंगणवाडी ताई, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. गणेशजी सोनवणे, श्री.राम सोनुले, श्रीकांत सोनवणे, अशोक गोरे, सोपान राऊत, ओमकार लोंढे, शिवकुमार लोंढे, सुनील यशवंत, संतोष राऊत, आकाश मोरे ,योगेश गायकवाड, पैठण विठ्ठल लोंढे व मॅडम यांचे सर्व स्नेही यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राऊत सर यांनी केले.
आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन प्रचंड उष्णता असतानाही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल विश्वकर्मा वंशीय समाज संघटना अहमदनगर यांच्या वतीने तसेच लोंढे परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप आभार..