महिलाच समाजाला आकार देऊ शकते चक्रवतीबाई राठोङ मॅङम…
मुखेङ :-8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर पाहतो. तसंच महिलांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो. मात्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी या सर्वांचाच सन्मान करण्याचा हा दिवस. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या असंख्य लहान सहान गोष्टींची जाणीव ठेवून त्यांचा आदर करण्याचा हा दिवस. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला #जागतिकमहिलादिनाच्याशुभेच्छा…
8 मार्च महिला दिन म्हणुन सावरगाव /पि/ जि. प. शाळेत येथे जागतिक महिला दिनी माता पालक मेळाव्यात चक्रवतीबाई राठोड प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या… याप्रसंगी उपस्थित महिलांना संबोधित करताना महिलांचं विश्व अर्ध आहे. महिलांनी मनावर घेतलं तर त्याच जगाला नवा आकार देऊ शकतात. घरादाराची काळजी घेत महिलाच घर सुसंस्कारित करू शकतात.
पुरुषांपेक्षा ही महिलांची कार्यशक्ती अधिक असते. जगातील सर्व महापुरुषांच्या पाठीमागे महिलेचा भक्कम आधार होता म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार आला. सर्व महिला भगिनींनी आपल्या आदर्शांचा वारसा घेऊन कार्य चालवावे. असे त्या म्हणाल्या.
सावरगावच्या जि. प. प्रशाळेत महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महिला शक्तीचा जागर करत समयोचित भाषणे केली. कोरोना काळातील कटू आठवणीतून सावरत आपण आपल्या कामाला अधिक गतिमान करूया. असा संकल्प करण्याचा निर्धार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला. शाळेच्या वतीने कोरोनात जोडीदार गमावलेल्या महिलांनी दुःखातून सावरत आपल्या पाल्य विषयक जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पडत असल्या बद्दल पाच महिलांचा सन्मान करण्यात आला..
या मेळाव्याला सावरगाव नगरीचै सरपंच सौ. हिना इनामदार , उपसरपंच सौ .नसिमा मुजावर यांच्यासह गावातील शंभराहून अधिक महिला पालक उपस्थित होते.. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मु.अ. गोविंद चव्हाण, धनाजी जाधव, नितीन दळवी, खालेद मोमीन, पंढरी सूर्यवंशी, जयश्री भरडे, रेखा काळे, शंकर मुसांडे, संदेश महामुनी, शालन होट्टे बालाजी अष्टुरे, जैनु मामा आदि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे संचलन रेश्मा कांबळे या विद्यार्थिनीने केले.