दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महाडच्या छबिनानिमित्त दुदैवी घटना | पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

सागर पवार - जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड: आकाश पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना महाडच्या छबिन्यात घडली. यामहिलेला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.

पल्लवी सुरेश कोळवणकर (वय ३०, रा. निजामपूर, ता. माणगांव ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती आपल्या कुटुंबासह छबिन्याचा आनंद घेण्यासाठी महाडमध्ये आली होती. पाळण्यात बसत असताना अचानक पाळणा सुरु झाला आणि तिच्या डोक्याचेकेस पाळण्यात अडकले. त्यामुळे डोक्याच्या केसांसह डोक्याच्या त्वचेचा मोठा भाग उपटून पडला, तिला तातडीने महाड मधील डॉ. रानडेयांच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. रानडे यांनी त्वचेचा हा तुटलेला भाग शिवून या महिलेला अधिक उपचारांसाठी मुंबईला पाठविलेआहे. या बाबतीत अधिक तपास सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे