गंगापूर प्रतिनिधी-बाळासाहेब पिसाळ
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन,मत्स्यव्यवसाय विभाग औरंगाबाद,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण गंगापूर तालुक्यातील अमळनेर, लखमापुर गावात संपन्न झाले.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून गंगापूर तालुक्यात ग्रामीण पुनर्जीवन कार्यक्रमा अंतर्गत सहा गावामध्ये कार्य करत आहे,
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम मॅजिक बस इंडिया फाउंडेशन मत्स्यव्यवसाय विभाग औरंगाबाद तसेच आत्मा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी श्री दिनेश मंगीराज यांनी केले. या कार्यक्रमासाठी मत्स्यव्यवसाय विभाग सहायक आयुक्त पवार मॅडम,सना पटेल मॅडम अधिकारी औरंगाबाद,अजिनाथ कोलते अधिकारी औरंगाबाद,अमळनेर चे सरपंच लवकुश कर्जुले,ग्रामसेवक वांढेकर साहेब,किरण साळवे उपसरपंच,रामेश्वर मिसाळ ग्रा.प.सदस्य, अफजल पठाण ग्रा.प. सदस्य,अविनाश साळवे ग्रा.प.सदस्य,कोरडकर साहेब सरपंच लखमापुर,राधेश्याम कोल्हे ग्रा.प.सदस्य यांचा सन्मान मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने केला गेला.
यावेळी बोलताना दिनेश मांगीराज म्हटले की मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण आणि विविध शासकीय योजना साठी ईश्रम कार्ड,जॉब कार्ड,व्यवसाय कार्ड काढणे महत्वाचे आहे,हे कार्य मॅजिक बस इंडिया फाउंडेशन दोन वर्षांपासून करत आहे,
कार्यक्रमाच्या प्रसंगी सना पटेल मॅडम म्हटल्या कि मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजना ची माहिती दिली गेली,यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना,SC, ST, महिला यांना असलेलले अनुदान मत्स्य बीज,मत्स्यपिल्ल,मत्स्यतळी बांधकाम,ई- रिक्षा,शितपेटी,मोटारसायकल,सायकल शितपेटी,रंगीबेरंगी मासे व्यवसाय जिवंत मासे विक्री साठी असलेले अनुदान याची माहिती दिली.
पवार मॅडम सहायक आयुक्त म्हटल्या कि फिश वडा,फिश समोसा,फिश लोणचे,याचे व्यवसाय प्रशिक्षण देखील मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दिले जाते,
यासाठी असलेल्या केंद्र आणि राज्य सरकार च्या योजना मत्स्य प्रकार,प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना इत्यादी माहिती दिली गेली,मॅडम पुढं म्हणाल्या की, सरकारी योजना कडे पूरक व्यवसाय व आर्थिक सुबकता च्या दृष्टीने मत्स्यव्यवसायाकडे बघा,शासकीय योजना म्हणून बघू नका ,प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या सर्वाना या वेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटण्यात आले,
या कार्यक्रमासाठी मत्स्य व्यवसाय करणारे महिला पुरुष,लखमापूर, अमळनेर येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य सरपंच,ग्रामसेवक व आदी उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी श्री दिनेश मंगीराज,कैलास धांडे,अझीम शेख,जगदीश सातपुते,प्रमोद कोल्हे,अमर धावरे,अर्चना शिर्के, ज्ञानेश्वर हावळे,बाळासाहेब पिसाळ,गणेश भणगे,रायफल साळवे इत्यादींनी प्रयत्न केले.