आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन चा वतीने गुरुदत्त माती परीक्षण केंद्र उद्घाटन कार्यक्रम
आज दिनांक 03/03/2022 वार गुरुवार रोजी वाहेगाव गाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद विभागातील शेतकरी यांना माती परीक्षणसाठी जवळपास कुठेही केंद्र नसल्याने शेतकरी माती परीक्षण न करता शेती करत आहे त्यामुळे शेतीला लागणारा खर्च खूप वाढला आहे आणि शेतीमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी अडचणी दिसत होता गावात आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत फळबाग प्रशिक्षण अंतर्गत माती परीक्षण किती महत्त्वाचे आहे या शेतकरी यांना मार्गदर्शन केले आणि माती परीक्षण मशिन विषयी मार्गदर्शन केले आणि गुरुदत्त शेतकरी उत्पादक गटातील सदस्य श्री.संतोष शिवाजी मनाळ यांनी पुढाकार घेऊन आय सी आय सी आय फाउंडेशनचा वतीने माती परीक्षण मशिन केंद्र आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यात आली.आणि आज गरुदत्त शेतकरी उत्पादक गट संचलित गुरुदत्त माती परीक्षण केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला ,कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी श्री.सुहास नाईक सर( Zonal Head ICICI FOUNDATION ), श्री.दिपक पाटील सर ( program Manager ICICI FOUNDATION ), श्री. जितेंद्र सोरटे सर( D.O.ICICI FOUNDATION ) आणि श्री. सोपान पाटील सर ( C.F.ICICI FOUNDATION ) तसेच श्री. मधुकरराव वालतुरे सर (जि. प.स्थायी सदस्य),श्री. सुभाष मनाळ (कृषी सल्हागार वाहेगाव) सुदामराव मनाळ (सरपंच), गावातील कुषी सेवा केंद्र मालक आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.