दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे ‘लालपरी’ वर दगडफेक….!चालक किरकोळ जखमी

सौंदाळा प्रतिनिधी। काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते.त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली.या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. दरम्यान काल राज्य सरकारने एसटी मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसला पोलिस बंदोबस्त देण्याचे सांगितले होते.त्यानुसार शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला पण शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही.दरम्यान शेवगावहुन नगरकडे जाणाऱ्या गाडीवर अज्ञात इसमाने शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे दगड मारल्याने पाठीमागची काच फुटली आहे.तर श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे व शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक केली आहे.यामध्ये चालक नामदेव खंडागळे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आता एसटी सुरु झाल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण होते, मात्र या प्रकारामुळे सर्वजण धास्तावले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे