श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीला उच्च न्यायालयाचा दणका…..!
सभापती पदाच्या निवडणूकीची सभा होणार मात्र सभापती पदाला स्थगिती...!
वांगी प्रतिनिधी।श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड आज गुरुवार दि.१८ रोजी होणार होती, असे असतांनाच मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नव्याने होणाऱ्या सभापती निवडीला स्थगिती दिली आहे.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केली होती.मात्र माजी सभापती दिपक पटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या सभापतीपदाच्या निवडणुकिला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला यांनी सदर याचिकेच्या सुनावणी वेळी सदर निवडणूक प्रक्रिया करून सभापती निवडीच्या घोषणेला स्थगिती दिली असल्याची माहिती माजी सभापती दिपक पटारे यांनी दिली आहे.
पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ.संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ.सौ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती.ज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे सौ.वंदना मुरकुटे यांचा सभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आज गुरुवारी सभापती पदाची निवडनुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता ,मात्र माजी सभापती दिपक पटारे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात सभापती पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला यांनी सदर निवडणूकची सभा घ्यावी मात्र सभापती पदाची निवड घोषित करू नये आदेश दिला आहे.यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड.सिद्धार्थ ठोंबरे यांनी काम पाहिले तर अॅड.स्वप्नील काकड यांनी सहकार्य केले.