राज्य परिवहन एस टी कामगारांच्या संपला नेवासा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पाठींबा…
प्रतिनिधी- सचिन कडू पाटील
नेवासा प्रतिनिधी। मागील 7 सात दिवसापासून राज्यभर चालू असलेल्या एस टी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी नेवासा तालुका एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला नेवासा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दि १३ रोजी तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड, राम शिंदे, पवन गरूड, सचिन कडू, अमोल मांडण,बाळासाहेब पिसाळ राजेंद्र कडू, राहुल चिंधे यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र देण्यात आले
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मकरंद देशपांडे बोलताना म्हणाले की एरवी सुखाच्या किंवा दुःखाच्या भेट देण्यासाठी गरीब असो की श्रीमंत सर्व जण एसटी ने प्रवास करतात तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप शासनाने गांभीर्याने घेऊन विली करणाचा निर्णय घेऊन संप स्थगित करावा एरवी लहान पण मामाच्या गावाला घेऊन जाणारी लाल परी सध्या अडचणीत आहे
पोर्टल मीडियाचे सौरभ मुनोत म्हणाले की तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या लढाईत फक्त बातमी पुरते मर्यादित न राहता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व संघटना देखील पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी आहे
या प्रसंगी संघटनेच्या वतीने गेल्या सात दिवसा पासून ठिय्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना चहा व बिस्किटे वाटप करण्यात आली यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते व एसटी संघटनेचे वतीने आभार पत्रकारांचे अभार व्यक्त केले.
एस टी कामगारांची मागणी योग्य असून शासनाने एक पाऊल पुढे यावे व झालेल्या आत्महत्या बघता सकारात्मक विचार करावा एस टी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ लढेल
—मोहन गायकवाड.
(तालुका अध्यक्ष)