हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर नदी, व लेंडी नाल्याला पुर….
नेवासा। दि.1 ऑक्टोबर 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या पावसाने हंडीनिमगाव येथील प्रसिद्ध असलेले भगवान त्रिवेणीश्वर देवस्थान, पूर्ण महादेव पिंड आणि मंदिराच्या गाभाऱ्यात 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी होते.त्याच बरोबर मंदिर परिसर आणि त्रिवेणी नदी ते जाधव वस्ती हा संपर्क काही तासासाठी तुटला होता कारण पुलावरून पाणी विसर्ग जास्त असल्याने चार चाकी वाहन आणि दोन चाकी वाहन जाऊ शकत नव्हते आज सकाळी 10 वाजता पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने जनजीवन सुरळीत झाले,
तसेच वार्ड क्र.3 मध्ये असलेला रिलायन्स पंप जवळून वाहणारा ओढा देखील दुथडी भरून वाहत होता.
या पावसाने व पाण्याने मंदिर परिसरात नुकसान झाले,झाडं पडले,दानपेटीत पाणी शिरले तसेच वीज कनेक्शन चा बोर्ड देखील पडला आहे असे नुकसान देवस्थान व गावात झाले, त्या सोबतच पूल नुकसान झाले आहे,
या सोबत शेतकऱ्यांचे कापूस ,सोयाबीन,कांदा,तसेच गोरख गुंजाळ माजी सरपंच हंडीनिमगाव यांच्या घराजवळ असलेले सुका चारा ची वळई पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान पाण्यात वाहून गेली अशी माहिती हंडीनिमगाव चे मा.सरपंच गोरक्षनाथ गुंजाळ यांनी दिली=