अहमदनगर प्रतिनिधी- मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 मध्ये ज्योती या शॉर्टफिल्मला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व उसासून आले मन या गाण्याला बेस्ट प्रोडूसर व बेस्ट सॉंग असे पुरस्कार देण्यात आले. ज्योती ही शॉर्ट फिल्म वालुथ,आखाडे ता. जावली गावामध्येच शूट करण्यात आली होती व खूप चांगल्या प्रकारे गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत बॉडीने खूप चांगला प्रतिसाद दिला त्याचबरोबर प्रॉडक्शन हाऊस मधील सर्व टीम मेंबर्सच्या कलाकारांच्या मेहनतीच्या जोरावर हा पुरस्कार प्राप्त केला.ज्योती या लघुपट्याला विशेष असा बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड रवी वाव्होळे वृंदावन फिल्म व बेस्ट निगेटिव्ह रोल रोहन भोसले यांना देण्यात आला. तसेच उसासून आलंय मन ह्या गाण्यालाही बेस्ट प्रोडूसर अवॉर्ड ने अभिजित भोसले यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अनेक दिग्गज मान्यवर चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आखरे तसेच पूर्ण महाराष्ट्रतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मराठीतील जेष्ठ कलावंत प्रदीप वेलणकर सर ही उपस्थित होते. ज्योती या शॉर्ट फिल्म मध्ये राजू गोसावी, सचिन माधव, प्रतीक्षा बगाडे, अंकिता गायकवाड, रवी वाव्होळे, रोहन भोसले, अभिजीत भोसले, अमित कांबळे,किरण बगाडे, अरविंद घाडगे इत्यादी कलावंत होते. मुंबई इंटरनॅशनल फेस्टिवल व तमिळनाडू इंटरनॅशनल फेस्टिवल नंतर आता सर्वात मानाच्या अशा केंद्र शासनाच्या मानव अधिकार आयोगाच्या(NHRC) या पुरस्कार पटकावण्याची उत्सुकता या टीमला आहे. या मुंबई एंटरटेनमेंट फिल्म फेस्टिवल 2022 पुरस्कार मिळाल्या नंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षा पाहताना दिसत आहे.. येणारे काळात हे भोसले ब्रदर्स कला क्षेत्रामध्ये अनेक शॉर्ट फिल्म, चित्रपट, अल्बम सॉंग ची निर्मिती करून आपला ठसा देशभरात व परदेशात ही उमटवतील अशी आशा सर्वांना आहे….