अहमदनगर
नेवासा तालुक्यात वरुण राजाची दमदार हजेरी….
नेवासा प्रतिनिधी।दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी नेवासा तालुक्यात वरूनराजाने दमदार हजेरी लावली आहे,बऱ्याच दिवसांनी हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आंनद निर्माण झाला असून काही शेतमालासाठी हा पाऊस नुकसान दायक देखील ठरणार आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हा पाऊस पुढील आगामी पिकासाठी वरदान ठरणार आहे, ऊस उत्पादक शेतकरी, फळबागा धारक शेतकरी यांना हा पाऊस वरदान ठरला आहे.
हंडीनिमगाव येथे वादळी वाऱ्यासह एक तास पाऊस बरसला.