शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणाला सुरुवात…
बाळासाहेब पिसाळ

शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षण मा. डॉ. राजेश बनकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील द. ह. घाडगे पाटील विद्यालय नेवासा या ठिकाणी सुरू झाले असून प्रशिक्षणाचे उद्घाटन नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणीय सामलेटी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले…….
सदर जिल्हास्तर जिल्हास्तरीय प्रशिक्षण दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात नेवासा व शेवगाव तालुक्यातील 78 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्या मध्ये श्रीरामपूर व पाथर्डी तालुक्यातील 60 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उद्घाटना वेळी गटशिक्षणाधिकारी सामलेटी मॅडम यांनी नेवासा व शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला व अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मूल्यशिक्षणाचे असणारे महत्त्व आणि सध्याच्या काळात मूल्य शिक्षणाची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती प्रास्ताविकात सांगीतली………
प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री नितीन कमल किशोर मालानी, श्री शितल गोरे, श्री प्रदीप पाबडे तालुका शेवगाव आणि श्री राहुल आठरे, अण्णासाहेब शिंदे सतीश कुमार बडे तालुका नेवासा हे कामकाज पाहत आहेत.
यावेळी व्यासपीठावर श्री. मुकुंद दहिफळे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, श्री सोपानराव काळे प्राचार्य दा.ह. घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा श्रीम. रुकसाना शेख विस्तार अधिकारी, श्रीम. मीरा केदार विस्तार अधिकारी, श्री. बाळासाहेब काशीद, रविंद्र कडू पाटील केंद्रप्रमुख शेवगाव , श्री. मधुकर घुले, नितीन मिसाळ, काकासाहेब गर्जे विषयतज्ज्ञ पंचायत समिती शेवगाव शांतीलाल मुथा फाउंडेशन चे बाळासाहेब पिसाळ, संतोष पवार, सूरज बोरुडे आणि नेवासा व शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते………..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समी शेख विषय तज्ञ पंचायत समिती नेवासा यांनी केले तर नियोजन श्री विठ्ठल कांगुणे व समी शेख यांनी केले.
