काँग्रेस च्या कार्यकर्त्यांची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न….
अहमदनगर प्रतिनिधी। शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांच्या निवासस्थानी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन नवीन कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश झाला
या प्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना संबोधित केले,कार्यक्रम प्रसंगी आमदार लहू कानडे, काँग्रेस चे विविध अधिकारी पदाधिकारी जिल्हा एस सी विभाग अहमदनगर चे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस एस.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वाघमारे यांच्या निवासस्थानी भेट दिली प्रसंगी श्रीरामपूर चे आमदार लहु कानडे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कडू पाटील कर्डिले जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर भणगे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम प्रसाद भाऊ पटारे काँग्रेस प्रदेश समन्वयक बंटी भाऊ यादव शिवाजीराव जगताप सुरेश नगर चे सरपंच पांडुरंग पाटील उभेदळ हंडीनिमगाव चे सरपंच अण्णासाहेब जावळे भिवाजीराव आघाव संतोष भाऊ उंडे कला आणि सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कडू मक्तापूर चे माजी सरपंच राम कृष्ण कांगुणे नितीन कांबळे आधी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.