अनुसूचित जमातीसाठी विशेष मोहीम राबवा;नेवासा काँग्रेसची तहसीलदार यांच्या कडे मागणी….
प्रतिनिधी लखन वाल्हेकर
नेवासा प्रतिनिधी।अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी शिधापत्रिका , जातप्रमानपत्र, आधारकार्ड देनेकामी नेवासा तालुक्यात विशेष मोहीम अयोजित करण्याची मागणी नेवासा काँगेस कडून करण्यात आली.
राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयाकडुन ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले होते, यामध्ये शिधापत्रिका मध्ये नाव समाविष्ट करणे ,नाव कमी करणे , नावात बदल करणे, शिधापत्रिका विभक्त करणे, जातप्रमानपत्र देने, जातप्रमानपत्र पडताळणी करून देणे, आधारकार्ड नोंदणी, आधारकार्ड देने अशा योजनाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, तसेच शहरी भागात ही विषेश मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेबाबत ग्रामपंचायत स्तरावर “चावडीवाचन” करण्यात यावे असेही निर्देश देण्यात आले आहे.
असे निर्देश दिले असतानाही नेवासा तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये, नेवासा शहरात ही मोहीम राबविण्यात आली नाही. नेवासा काँग्रेसने याची दखल घेऊन आज नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदनाद्वारे सदर मोहीम तालुक्यात राबवून यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश द्यावे तसेंच अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली,
यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, संघटक संदीप मोटे, शहर उपाध्यक्ष मुसा बागवान, अनुसूचित जमाती अध्यक्ष श्याम मोरे, जेष्ठ सदस्य रमेश जाधव, महिला काँग्रेसच्या शोभाताई पातारे,युवक काँग्रेसचे कार्यध्यक्ष आकाश धनवटे, एनएसयुआई अध्यक्ष सौरभ कसावणे, जितेंद्र पतंगे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते,
तसेच आघाडी सरकारच्या काळात सर्व घटकासाठी तळागाळातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे , यामध्ये प्रशासनाने त्या पूर्णक्षमतेने राबविल्यास या योजनांचा फायदा जनतेला नक्कीच होईल.. योजना यशस्वी होण्यासाठी काँग्रेस पक्ष देखिल पाठपुरावा करत राहील – संभाजी माळवदे , अध्यक्ष नेवासा तालुका काँग्रेस कमिटी यांनी सांगितले.