मुखेङ..
सतेच्या बदलाने मुखेडचे राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित चिञ दिसुन येत आहे. भाजप कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यांचे हौसले बुलंद असेच चिञ दिसुन येत आहे…
राज्यात भाजप- शिंदे गटाचे नवे सरकार होताच मुखेड कंधार विधानसभा मतदार संघातील भाजप | कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे कार्यसम्राट आमदार डॉ . तुषार राठोङ यांच्याकडे पुन्हा सत्ताकारणाचे सूत्र हाती येणार असल्याने मुखेडसह जिल्ह्यातील राजकीय | समीकरणे बदलणार असल्याचे चित्र समोर आले आहे ..
अडीच वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत मुखेड कंधार विधानसभा मतदार संघातून आमदार डॉ तुषार राठोड हे भाजपकडून दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी झाले .
परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्याने आमदार राठोड यांना यांच्या विकास कामांच्या निधीसाठी अडथळे येत होते. आता चार दिवसांपूर्वीच भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेत आल्याने मुखेङला भरभरुन निधी मिळेल अशीच अशा भाजप तरुनामध्ये निर्माण झाली आहे..
लोकप्रिय आमदार डॉ . तुषार राठोड यांना जिल्ह्याचे पालकमंञी मिळण्याची दाट शक्यता माणली जात आहे.
पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुखेड सह जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात विकास कामांना चालना मिळेल , असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
चार दिवसांपासून तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आ . डॉ . राठोड यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सगळीकङे चालू आहे…