सटाणा ते वाठोडा लालपरी सुरू करण्याची मागणी सटाणा आगार डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले…
प्रतिनिधी /अजय ठाकरे
नाशिक प्रतिनिधी।सटाणा ते वाठोडा गावांना तालुका ला जोडणाऱ्या मार्गावर मागील दहा बारा महिन्यापासून परिवहन मंडळाची बस सेवा बंद असून तालुक्यापासून 40 ते 45 किलोमीटर चा प्रवास वाहनाच्या अभावाने नागरिकांसाठी खडतर ठरला आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन बस सेवा सुरू करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि त्यासाठी लागू केलेली संचारबंदी पासून या भागात आज पर्यंत परिवहन मंडळाची लाल परी अद्याप धावली नाही
वाठोडा ते सटाणा या पर्यंत मार्ग सुरळीत सुरु झालेला आहे. तेव्हा या मार्गावरील बस सेवा सुरु करण्यास अडचण नाही. सध्या शेतीची कामे, शैक्षणिक कामे,विद्यार्थी ची शाळा,दवाखाना, कार्यालयीन कामे, करण्याची वेळ आहे. तालुका ते जिल्हा स्तरांवरील कामासाठी नागरिकांना पायपट्टी करावी लागते आहे. अशातच बससेवा सुरु नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन बससेवेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील नागरिक श्नी.बाबुलाल महाराज ठाकरे, नामदेव खांडवी, चिंतामण आनंदा ठाकरे ,संजय ठाकरे ,हरिश्चंद्र ठाकरे ,रमेश चौरे, आत्माराम ठाकरे मोहन गायकवाड, शामराव खांडवी, बारकू जाधव् आदी ग्रामस्थांनी केली आहे.