महिलांनी जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व योजनांचा लाभ घ्यावा- सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे.
कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद)
कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद) :- आज शिक्षक कॉलनी लोहा येथे मातोश्री वसतिगृहात जिल्हा औद्योगिक केंद्रातर्फे एम.सी.इ.डी.प्रमाणपत्र शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित महिलांना बोलताना आशाताई म्हणाल्या की, महिलांनी जिल्हा औद्योगिक केंद्रातर्फे मिळणाऱ्या बचत गटाच्या व वैयक्तिक लाभार्थ्याच्या सर्व योजनेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही योजनेबद्दल माहिती असो वा अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा यावेळी उपस्थित प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले व आयोजकांच्या वतीने आशाताई यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अश्विनीताई कापुरे, कार्यक्रमाच्या आयोजक अर्चनाताई सूर्यवंशी, सिद्धू पाटील वडजे, संचालक सुधाकर सातपुते, चेअरमन नागेश पाटील खाबेगावकर, प्रसाद पाटील जाधव,अमोल गोरे, बचत गट लोहा नगरपालिका उषाताई शिंदे, बचत गट ग्रामपंचायत सविताताई सातेगावे, कविताताई सूर्यवंशी,अर्चनाताई शिंदे, सविता ताई मुंडके, अनुसयाताई देसाई, पूजाताई सूर्यवंशी सह महिला आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.