
मुखेङ प्रतिनिधी।ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.. 1) आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही.
2) गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करित आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस राज्य सरकारला सातत्याने सांगत आहेत. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. 3) इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी योग्य ती पाऊले त्वरित उचलावित. अन्यथा आगामी काळात भाजपा उग्र आंदोलन करेल.
अश्या प्रकारचे निवेदन देतांना मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार गोविंदराव राठोड साहेब,महाराष्ट्र ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष माधव अण्णा साठे,डॉ.माधव पाटील उच्चेकर भाजपा सरचिटणीस नांदेड,लक्ष्मण पाटील खैरकेकर सभापती,डॉ वीरभद्र हिमगिरे भाजपा तालुकाध्यक्ष, अशोक गजलवाड,माधव राठोड भाजपा ओ बी सी तालुका अध्यक्ष मुखेड, चंद्रकांत गरूडकर नगरसेवक, राजू बामणे,नासार पठाण,जगदीश बियाणी,गौतम काळे,दीपक मुक्कावार,विनोद आडेपवार,राम पाटील गायकवाड,सौ. राजश्री राठोड महिला आघाडी ता.अध्यक्ष,किशोरसिह चौहान शहराध्यक्ष, मुखेड,विलास कोडगिरे,व्यंकट जाधव वसुरकर,बालाजी पाटील शिंदे,बालाजी पाटील जांभळीकर,गोटू पाटील बिल्लालीकर,महावीर शिवपूजे, सुधीर चव्हाण,विनोद दंडलवाड,शिवकुमार बंडे,मुजिफ सौदागर,बालाजी रामपुरे,रमेश राठोड,समीर गजगे,राजू पातळ उद्रि,पौर्णिमा बेटमोगरेकर,भाग्यश्री पवार,पिंटू बादेवाड,गंगासागर ताई,जनाबाई कांबळे, गणेश पोतदार, शंकर नागरगोजे,आदी शक्तीकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते….