ॲक्रीटेक सोल्यूशन्स पुणे यांचेकडून मेंगडेवाडी येथे श्रमदानातून वृक्षारोपण व बिजारोपण…
धनंजय मेंगडे पुणे प्रतिनिधी
मेंगडेवाडी (आंबेगाव )ॲक्रीटेक सोल्यूशन्स पुणे आणि वटवृक्ष मेंगडेवाडी एक हरित चळवळ यांच्या सयुंक्त विद्यमाने विविध प्रकारच्या देशी ५०० रोपांचे वृक्षारोपण व १००० बियाचे बिजारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणुन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,पोलिस निरीक्षक सतीश होडगर,सहा.पो.निरीक्षक घोडेगाव जीवन माने, सहा.पो.निरीक्षक दादर महेश थिटे, सामाजिक वनीकरण विभागाचे RFO जयश्री पवार मॅडम, वनपाल सामाजिक वनीकरण संतोष बिराजदार, वन विभागचे दशरथ मेंगडे, पोलिस पाटील नितीनराव मेंगडे व ॲक्रीटेक सोल्यूशन्सचे समीर सोळसे व गणेश मांदळे व कंपनीचा पूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुपच्या कामाचे कौतुक करत आजुबाजूच्या गावांनी सुद्धा यातून प्रेरणा घेऊन वृक्षारोपण करून धरनी मातेच्या सेवा करावी असे मत पोलीस निरीक्षक होडगर साहेब यांनी व्यक्त केले.तसेच यावेळेस वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुपचे सभासद व मेंगडेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.प्रस्ताविक ग्रामसेवक जयंवत मेंगडे यांनी केले तसेच ग्रुपचे उपाध्यक्ष सतीश मेंगडे यांनी सर्वांचे आभार मानले.