दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमराठवाडायवतमाळ

पोफाळीचा_वसंत_फुलला ;* *साखर_कारखान्याचा_बॉयलर_अग्नीप्रदीपन_सोहळा !*

 

वसंतनगर पोफाळी ता. उमरखेड

हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणा रा आणि मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पुजन करून चिमणी पेटवण्यात आल्याने पोफाळीत खऱ्या अर्थानं ” वसंत फुलला ” असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात मोठा उत्साह आणि आनंदी वातावरण आहे.
हा अग्नी प्रदिपन सोहळा केवळ व्यावसायिक नसून तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आहे. त्यामुळेच प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी कुटुंबाच्या हस्ते पूजा करून शेतकरीराजा प्रति उतराई होता यावं एवढीच माफक अपेक्षा!.या पूजेला वेदराज ठेंगे व सौ. वैशालीताई ठेंगे रा. आरेगाव ता. पुसद, अंबादास ठाकरे व उषाताई ठाकरे रा. उटी ता. महागाव, प्रविण देवसरकर व सौ. रंजनाताई देवसरकर रा. देवसरी ता. उमरखेड, गंगाधर कदम व सौ. सुजाताताई कदम रा. फळी ता. हदगाव आणि अवधूत कदम व सौ. ललिताताई कदम रा. वारंगटाकळी ता. हिमायतनगर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, वसंत साखर कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र कटियार, बाबुराव पाटील कोहळिकर, अॅड. रविंद्र रगटे,डॉ. सोमेश्वर पतंगे,प्रा. सुरेश कटकमवार,प्रीतेश पाटील, प्रसाद महले पाटील,दीपक कल्याणकर यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे