औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल आणि वॉश या प्रकल्पाचे उद्घाटन*
बाळासाहेब पिसाळ
*औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल आणि वॉश या प्रकल्पाचे उद्घाटन*
पांगरा :-दिं 12 जानेवारी रोजी पांगरा येथील जि.प.प्राथमिक शाळेत ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल व वाॅश इन स्कूल या प्रकल्पाचे उदघाटन औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक्स चे कार्यकारी संचालक मा.श्री. विनायक पाॅल सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प चे कार्यक्रम अधिकारी श्री. सोज्वळ जैन सर, पैठणचे गटशिक्षण अधिकारी श्रीराम केदार सर, चितेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री डूकरे सर, बिडीकिनचे केंद्र प्रमुख श्री.सोनवणे सर, पांगरा सरपंच भाग्यश्री क्षीरसागर, अतुल क्षीरसागर, पांगरा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान पठाण,मुख्याध्यापिका मिना भोसले, चितेगाव च्या मुख्याध्यापिका वानखडे मॅडम, पैठणखेड्याचे मुख्याध्यापक बर्डे सर,बोकूड जळगावचे मोरे सर याच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक्स च्या माध्यमातून शालेय स्तरावर प्रमिथ फाऊंडेशन व सीवायडीए यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटन सञाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिथ फाऊंडेशन चे योगेश गोरटे व सीवायडीए चे संचालक प्रविण जाधव यांनी केले. यानंतर प्रमिथ फाऊंडेशन ने जि.प.प्राथमिक शाळा पांगरा व चितेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी *हात धुणे व धुंकणे* या विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यानंतर औरंगाबाद इलेक्ट्रिकल चे श्री अनिल द्विवेदी, जि.प.चे सोज्वळ जैन सर ,गटशिक्षण अधिकारी श्रीराम केदार चितेगाव चे केंद्र प्रमुख डुकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी संचालक पाॅल सर यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन मॅडम यांनी केले. तर आभारप्रदर्शन विकास मस्के यांनी केले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार प्रमिथ फाऊंडेशन व सीवायडीए च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलीत करून करण्यात आली. या कार्यक्रमास CIE Automotiveचे श्री प्रशांत शर्मा, नऊ गावचे जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सरपंच, गावातील ग्रामस्थ, पालक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमिथ फाऊंडेशन चे किशोर मराठे,अर्चना शिर्के,ज्ञानेश्वर हावळे,प्रतिभा लिहिनार, सचिन सपकाळ, सीवायडीए चे स्वाती सिरसाट, विकास मस्के जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक मुंडे ,खंबात,शिक्षिका नजन मॅडम यांनी परिश्रम घेतले.